मुंबई: राणा दग्गुबातीचा बहुचर्चित चित्रपट ”चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाची कथा जंगलात हत्तीसोबत राहणाऱ्या व्यक्तीभोवती फिरते. ज्याचे पुर्वज सुद्धा हेच काम करत होते. इरोस इंटरनॅशनलने एका व्हर्चुअल कॉन्फरन्समध्ये ‘हाथी मेरे साथी’चा हिंदी ट्रेलर रिलीज केला.

हाथी मेरे साथी एक असा चित्रपट आहे ज्यात नायक आणि त्याचं जंगल आणि तिथल्या प्राण्यासोबत असलेलं नातं याची एक भावुक कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचा नायक म्हणजे राणा दगगुबाती पर्यावरणाचं रक्षण करत त्याचं पूर्ण आयुष्य जंगलात व्यतित करतो. ही एक माणूस आणि एक हत्ती यांच्यातील भावनिक नात्याची कथा आहे. ज्याची प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे.

राणा दग्गुबातीचा ‘हाथी मेरे साथी’ २६ मार्चला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. हा चित्रपट एकूण तीन भाषांमध्ये रिलीज होणार आहे. ज्यात हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांचा समावेश आहे. राणा दग्गुबातीसाठी ही हॅट्रिक आहे. कारण ‘बाहुबली’, ‘द गाजी अटॅक’ नंतर आता ‘हाथी मेरे साथी’ हा त्याचा तिसरा चित्रपट आहे जो तीन भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात राणा दग्गुबातीसोबत पुलकित सम्राट, श्रिया पिळगांवकर आणि ज़ोया हुसैन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here