करोना संकटाने झोडपून निघालेल्या २०२०-२१ या वर्षात सरकारने आर्थिक आघाडीवर कशी कामगिरी केली याचे प्रगती पुस्तक अर्थात आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल आज विधानसभेत मांडण्यात आला. आर्थिक पाहणी अहवालामध्ये २०२० २१च्या पुर्वअनुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेत उणे ८ टक्के वाढ अपेक्षित आहे. उद्योग क्षेत्रात उणे ११. ३ टक्के आणि सेवा क्षेत्रात उणे ९ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
करोना संकटामुळं अर्थव्यवस्थेला मोठा फटका आहे. त्यामुळं महाविकास आघाडीसमोर आर्थिक घडी बसवण्याचे मोठे आव्हान आहे. राज्याचा जीडीपी यंदा ५. ७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला १ लाख ५६ हजार ९२५ कोटींची घट अपेक्षित आहे तर, चांगल्या पावसामुळं कृषी विकास दरातही ११. ०७ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या कृषी कर्जमुक्ती योजनेअंतर्गंत आतापर्यंत १९, ८४७ कोटींची कर्ज माफ करण्यात आली असून त्याचा लाभ ३१ लाख शेतकऱ्यांनी घेतला आहे.
करोना आणि लॉकडाऊनमुळं बांधकाम आणि वास्तुनिर्माण क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. बांधकाम क्षेत्राची उणे १४.६ टक्के घसरण होईल
दरडोई उत्पन्नात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न २, ०२, १३० आहे. देशात डरदोई उत्पन्नात हरियाणा अव्वल असून तेथील उत्पन्न २,६४,२०७ रुपये आहे. त्या त्याखालोखाल तेलंगणा, कर्नाटक, तामीळनाडू आहेत. महाराष्ट्र पाचव्या स्थानी आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times