मुंबई– मागील काही दिवसांपासून अभिनेत्री आणि निर्माता व दिग्दर्शक असलेले हे आयकर विभागाच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या घरांचा तपास केल्यावर काही संशयास्पद गोष्टी आढळल्याने आता त्यांना आयकर विभागाच्या अनेक प्रश्नांना समोर जावं लागणार आहे. हे सर्व प्रकरण फॅन्टम फिल्म्स प्रोडक्शन हाऊसने मिळकतीची योग्य माहिती न दिल्याने सुरू झालं होतं. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या मिळकतीमध्ये पैशांची हेराफेर करण्यात आली असून आयकर विभागाला कंपनीकडून चुकीची माहिती देण्यात आली आहे.

आयकर विभागाने बुधवार दि. ३ मार्च २०२१ रोजी तापसी पन्नू, अनुराग कश्यप, मधू मंतेना सह विकास बहल यांच्या घरांवर धाड टाकली होती. आता आयकर विभाकडून अनुराग आणि तापसी यांना विचारण्यासाठी १०० पेक्षा जास्त प्रश्नांची यादी तयार करण्यात आली आहे. यात त्यांच्या कामाशी निगडित प्रश्न आहेत. तसेच त्यांच्या चित्रपटाबाबत होणाऱ्या व्यवहाराबद्दलही यात काही प्रश्न असणार आहेत. त्यांचा दिग्दर्शक व निर्मात्यांसोबत असलेला व्यावहारिक संबंध यावरदेखील काही प्रश्न विचारण्यात येणार आहेत. इतकंच नाही, तर त्यांचे लॅपटॉप आणि फोनदेखील आयकर विभागाकडून जप्त करण्यात आले आहेत.

एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने तापसी आणि अनुराग यांना विचारण्यासाठी १३५ प्रश्न तयार केले आहेत. दोघांचेही लॅपटॉप आणि फोन जप्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागातर्फे तापसी आणि अनुराग यांच्या व्यवहाराची चौकशी विदेशातही करण्यात येणार आहे. आयकर विभागाने मागील दोन दिवसात मुंबई आणि पुणे मिळून ३० हून अधिक कलाकारांच्या घरावर छापे टाकले होते. मिळकत कर चोरी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here