ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांनी सांगितले की, हिंदी महासागरात अमेरिका आणि आमची भूमिका महत्त्वाची आहे. आसियान समुहातील देशांसोबतही चर्चा सुरू आहे. लवकरच क्वॉड देशाची बैठक होणार असल्याची खात्री वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. ‘क्वॉड’ हा चार देशांचा समूह हिंदी-पॅसिफिक महासागर परिसरात शांतता आणि समृद्धीसाठी एकत्रपणे काम करणार आहे. याचा फायदा या भागातील देशांना होणार असल्याचे त्यांनी म्हटले.
वाचा:
चीनचा तिळपापड
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी क्वॉडला इंडो-पॅसिफिक नाटो असे संबोधले आहेत. वांग यी यांनी सांगितले की, अमेरिका या भागाचे सैन्यीकरण करत आहे. त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये त्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले की, अमेरिका, जपान, आणि भारतामधील रणनितीक सहकार्य म्हणजे अमेरिकेकडून इंडो-पॅसिफिक नाटोच्या निर्मितीचा प्रयत्न आहे.
वाचा:
क्वॉड आहे तरी काय?
‘दि क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग’ (क्वॉड)ची सुरुवात वर्ष २००७ मध्ये करण्यात आली होती. त्याआधी भारताने २००४-०५ मध्ये भारताने दक्षिण-पूर्व आशियातील सुनामीग्रस्त देशांना मदत केली होती. क्वाडमध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारताचा समावेश आहे. मागील वर्षी मार्च महिन्यातही करोना संसर्गाच्या मुद्यावर क्वॉड देशांची बैठक पार पडली होती.
वाचा: चीनकडून विरोध
चीनकडून क्वॉडला सातत्याने विरोध केला जात आहे. विविध मुद्यांवर चर्चा करणे, सहकार्य करणे याशिवाय हे एकत्रपणे संयुक्त युद्ध सरावदेखील करतात. आशिया खंडात चीनच्या वाढत्या आर्थिक आणि लष्करी दादागिरीला उत्तर देण्यासाठी या क्वॉडची स्थापना झाली असल्याचे विश्लेषक सांगतात. या गट स्थापन झाल्यानंतर चीनची चरफड सुरू झाली आहे. त्यातूनच चीनने भारताने गटनिरपेक्ष भूमिकेचे धोरण न सोडण्याचे आवाहन करत क्वॉड, अमेरिकेच्या नेतृत्वातील गटात सहभागी न होण्याची धमकी दिली होती. क्वॉड गटातील बहुतांशी देशांसोबत चीनचे सध्या वाद सुरू आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times