मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ब्युटी पार्लर चालवते. पतीपासून विभक्त झालेली पीडिता काही दिवसांपासून आपल्या आजीच्या घरी राहते. दोन वर्षांपूर्वी पीडितेने आरोपीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात रवानगी केली होती. अलीकडेच तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्यानंतर तो पीडितेच्या शोधात होता.
आरोपीने भिंत ओलांडून घरात प्रवेश केला. त्यानंतर पीडितेच्या मामाच्या खोलीचा दरवाजा बाहेरून दोरीने बांधून लावून घेतला. त्यानंतर त्याने पीडितेला हाक मारली. ती खोलीतून बाहेर आली. त्यानंतर आरोपीने तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि पेटवून दिले. पीडिता किंचाळू लागली. घटनास्थळावरून आरोपी पसार झाला. तिच्या किंचाळ्या ऐकून शेजारी धावून आले. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती तिच्या आजीने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पीडितेच्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी घरातून बाहेर पळताना दिसत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याची चौकशी केली जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times