वाचा:
‘संजय राऊत यांनी छळ केल्याची तक्रार संबंधित महिलेनं न्यायालयात दाखल केली होती. न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर आज त्यावर सुनावणी झाली. ‘२०१३ पासून माझी छळवणूक सुरू आहे. माझ्या मागे माणसे लावली जात आहेत आणि माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. परंतु पोलिसांनी माझ्या तक्रारीची दखलच घेतली जात नाही. कारण संजय राऊत यांच्याविरोधात मी आरोप केले आहेत. आता कुठे मी याविरोधात कोर्टात येण्याचं बळ जमवलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगासमोर सप्टेंबर-२०२० मध्ये सुनावणी झाल्यानंतर आयोगानं चौकशीचे आदेश दिले. तरीही पोलिस उपायुक्तांकडून कारवाईच झाली नाही’, असा युक्तिवाद अॅड. आभा सिंग यांनी याचिकाकर्त्या महिलेच्या वतीनं केला.
वाचा:
संजय राऊत यांच्या वकिलांनी हे आरोप खोडून काढले. ‘महिलेसोबत माझे पूर्वीपासून कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तिला आणि तिच्या पतीला मी पूर्वीपासून ओळखतो. त्या दोघांमध्ये सुरू असलेल्या वादात मी पतीची बाजू घेतोय, असं वाटत असल्यानं तिनं माझ्याविरोधात विनाकारण आरोप केले आहेत, असा दावा संजय राऊत यांच्यामार्फत करण्यात आला. ‘याचिकादार महिलेनं २०१३ पासून पोलिसांत तीन एफआयआर नोंदवले आहेत. ही खूप जुनी प्रकरणं आहेत. एकाही एफआयआरमध्ये माझं नाव नाही. २०१३ मध्ये वाकोला पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या एफआयआर प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले, तर नंतरच्या अन्य दोन एफआयआर प्रकरणात पोलिसांनी ‘ए समरी’ अहवाल दाखल केले आहेत. तरीही महिलेला काही आक्षेप असतील तर तिनं न्यायदंडाधिकारी न्यायालयात जायला हवं’, असं म्हणणं राऊत यांच्या वकिलांनी मांडलं.
वाचा:
तूर्तास पोलिसांनी पहिल्या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्राची प्रत याचिकादार महिलेला आणि संजय राऊत यांना सोमवारपर्यंत द्यावी. तसंच, याचिकादारानं आरोपपत्रातील आरोप तपासून पाहावेत आणि त्यानंतर म्हणणं मांडावं’, असे निर्देश देत न्यायालयानं पुढील सुनावणी १९ मार्चला ठेवली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times