मुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. या घटनेचा तपास सुरु असतानाच त्या कारचे मालक यांचा मृतदेह सापडला असल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे विरोधपक्ष नेते यांनी या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळं हे प्रकरण गुंतागुंतीचं आणि आव्हानात्मक झालं आहे. इतक्या महत्त्वाच्या केसमध्ये जे महत्त्वाचा दुवा आहेत त्यांचा मृतजेह सापडतो त्यात काही तरी गौडबंगाल आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. तसंच, हे प्रकरण एनआयकडे वर्ग केलं पाहिजे आणि सत्य काय ते समोर आलं पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

वाचाः

अंबानींच्या प्रकरणातील इतकी महत्त्वाची माहिती माझ्याकडे येऊ शकते तरी ती गृहमंत्र्यांकडे जाणार नाही असं मला वाटत नाही. त्यामुळं गृहमंत्री याबाबत स्पष्ट भूमिका का मांडत नाहीत. इतकी माहिती बाहेर आल्यानंतर प्रकरण एनआयएकडे देणार की नाही हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. चौकशी सुरु असताना इतक्या महत्त्वाच्या साक्षीदाराचा मृतदेह सापडणं याचा अर्थ याला वेगळ्या तपासाची गरज आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

वाचाः

मनसुख हे या संपूर्ण प्रकरणात महत्वाची व्यक्ती होती. त्यांना तात्काळ संरक्षण पुरवण्यात यावे, अशी मागणी मी केली होती, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. तर, मनसुख हिरेन यांच्या व्हॉट्सअॅप कॉलची चौकशी केली पहिजे, त्यातून अनेक गोष्टी बाहेर येतील. मी राज्याला विनंती केली आहे लवकरच केंद्रालाही करणार आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here