ठाणेः मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कारचे मालक मुनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदर येथील खाडीत संशयास्पद आढळला आहे. यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. ठाणे पोलिसांनी मनसुभ हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. यांनी आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकलेलं नाहीये.

मागच्या महिनाच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर एका स्कॉर्पिओमध्ये अडीच किलो जिलेटीन कांड्या, चार गाड्यांच्या नंबर प्लेट आणि धमकीचे पत्र सापडले होते. यासाठी चोरीची गाडी वापरण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली होती. तसंच, या कारचा मुळ मालक ठाण्यात वास्तव्यास असून १७ फेब्रुवारीला मुंबईच्या दिशेने येत असताना गाडीचे हँडल लॉक झाले. त्यामुळे त्याने ती गाडी रस्त्याकडेला उभी केली आणि तो ओला कॅब करून मुंबईला आला. दुसऱ्या दिवशी गाडी त्या ठिकाणी नसल्याने त्याने विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

कालपासून बेपत्ता होते मनसुख

मनसुख यांचा ठाण्यात कार डेकोरचा व्यवसाय आहे. काल रात्री आठ पर्यंत ते दुकानात बसले होते. सोबत त्यांचा मुलगादेखील होता. त्याचवेळेस त्यांना कांदिवलीवरुन फोन आला आणि घोडबंदरला रस्त्यावर भेटायला बोलावलं असल्याचं सांगून ते दुकानातून बाइकवर घरी जाण्यासाठी निघाले.

मनसुख हिरेन हे दुकानातून घरी आल्यानंतर सुमारे ८. ३० वाजता घरातून बाहेर पडले. मात्र, तेव्हा त्यांनी बाइकसोबत नेली नव्हती. त्यानंतर मात्र त्यांचा कोणसोबतही संपर्क झाला नाही.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी ठाणे गुन्हे शाखाही तपास करत आहेत. तसंच, सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही केली जात आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात एडीआरही दाखल करण्यात आला आहे. तसंच, हिरेन यांच्या इमारतीखाली पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here