मुंबई: महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आली आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसली तरी गेल्या २४ तासांत तब्बल १० हजार २१६ नवीन रुग्णांचे निदान झाल्याने धोका अधिकच वाढला आहे. गेल्या जवळपास साडेचार महिन्यांतील ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. दरम्यान, राज्यातील अॅक्टिव्ह अर्थात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ९० हजारांच्या जवळ पोहचली आहे. ( )

वाचा:

राज्यात नियंत्रणात आला असे वाटत असतानाच पुन्हा साथीने डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाच ते नऊ हजारांच्या आसपास नवीन रुग्णांची भर पडत आहे. आज या रुग्णसंख्येने १० हजारचा टप्पा पार केल्याने भीती अधिकच वाढली आहे. यात आणि या दोन शहरांत गेल्या २४ तासांत अनुक्रमे १ हजार २२५ आणि १ हजार १७४ इतक्या मोठ्या संख्येने नवीन रुग्णांची भर पडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

वाचा:

करोनाचे आजची आकडेवारी पुढील धोक्याचे संकेत देत आहे. राज्यात आज ५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत या संसर्गाची लागण होऊन ५२ हजार ३९३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३८ टक्के एवढा आहे. आज राज्यात १० हजार २१६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ६ हजार ४६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ५५ हजार ९५१ करोना बाधित रुग्णांनी या संसर्गावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ९३.५२ टक्के इतके आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६६ लाख ८६ हजार ८८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ९८ हजार ३९९ (१३.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील होम क्वारंटाइन व्यक्तींची संख्या वाढत चालली असून ४ लाख १० हजार ४११ व्यक्ती सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ४ हजार २०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

जिल्ह्यात १८ हजार अॅक्टिव्ह रुग्ण

राज्यात नवीन बाधितांचा आकडा वाढत चालल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही पुन्हा एक लाखाच्या दिशेने सरकू लागली आहे. आजच्या नोंदीनुसार सध्या ८८ हजार ८३८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात आजही सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही संख्या आज १८ हजार ४०१ इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्यात ११ हजार ५५२, जिल्ह्यात ९ हजार ५७९ तर मुंबई पालिका हद्दीत ९ हजार ५५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here