पेईचिंग: चीनमध्ये शेकडो नागरिकांचा बळी घेणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसचा धोका जगाला सर्वात आधी सांगणाऱ्या डॉक्टरचा करोना व्हायरसमुळेच अत्यंत दुर्देवी मृत्यू झाला आहे. असं या डॉक्टरचं नाव आहे.

चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनेच ही माहीती दिली आहे. ३४ वर्षीय डॉ. ली वेनलियांग आणि इतर आठ जणांनी सर्वात आधी करोना सारखा भयानक विषाणू चीननमध्ये आला असून हा आजार जीवघेणा असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, संपूर्ण चीनमध्ये पसरलेल्या या जीवघेण्या आजाराचे वेनलियांगही बळी ठरले आहेत. वेनलियांग यांना डॉक्टरांनी वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आज उशिरा त्यांचं वुहान येथे निधन झालं.

३० डिसेंबर २०१९मध्ये वुहान येथे करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. स्थानिक मासळी बाजारातून सात रुग्ण आले होते. त्यांच्यामध्ये सार्ससारख्या आजाराची लक्षण आढळली होती. या रुग्णांना आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. त्यांनी या आजाराचं सुक्ष्म विश्लेषण केल्यानंतर हा असल्याचं त्यांना आढळून आलं. हा सर्वात मोठा व्हायरस असून त्याचा संसर्ग झपाट्याने पसरत असल्याचंही त्यांनी त्यांच्या अहवालात स्पष्ट केलं होतं. त्यांनी व्हिचॅटच्या ग्रुपवरून त्यांच्या मेडिकल स्कूलच्या सहकाऱ्यांना ही माहिती दिली होती. यावेळी त्यांनी या आजारापासून आपआपल्या नातेवाईकांना सावध करण्याच्या सूचनाही मित्रांना दिल्या होत्या. मात्र, काही तासांतच त्यांच्या मेसेजचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते. त्यावेळी पोलिसांनी वेनलियांग यांच्यावर अफवा पसरविल्याचा आरोप ठेवला होता.

२००३मध्येही या व्हायरसने चीनमधील शेकडो लोकांचे बळी घेतले होते. दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून चीनमध्ये थैमान घातलेल्या या आजाराने आतापर्यंत ४९० जणांचे बळी घेतले आहेत. तर चीनच्या ३१ प्रांतांमध्ये मिळून करोनाग्रस्त रुग्णांची संख्या २४,३२४ वर पोहोचली आहे. चीनच्या हुबेई या प्रांतात मंगळवारी करोनाचे ६५ रुग्ण नोंदविण्यात आले; तसेच करोनाचे नवे ३१ रुग्ण नोंदविण्यात आले. दरम्यान, ४३१ करोनाग्रस्त रुग्ण गंभीर असून, २६२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या ८९२ झाली आहे आणि संशयीत रुग्णांची संख्या एक लाख ८५ हजार आहे. संशयीतांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here