गोपालगंजः बिहारमध्ये न्यायालयाने साडेचार वर्षांनी मोठा निकाल दिला आहे. गोपालगंजमधील न्यायालयाने खजूरबानी विषारी दारूकांड प्रकरणी ९ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर ४ दोषी महिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

गोपालगंजमधील न्यायालयाने या घटनेतील १३ आरोपींपैकी ९ जणांना फाशिची शिक्षा सुनावली. तर ४ दोषी महिलांना जन्मठेपाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने फाशी शिक्षा सुनावताच दोषींच्या कुटुंबीयांनी न्यायालयाच्या परिसरातच टाहो फोडला. गोपालगंजच्या एडीजे २ या न्यायालयाने हा निकाल दिला.

खजूरबानी विषारी दारूकांडातील दोषी

१६ ऑगस्ट २०१६ मध्ये गोपालगंजमधील खजूरबानी येथे विषारी दारू प्यायल्याने १९ जणांचा मृत्यू झाला होता. तर ६ जण अंधळे झाले. या प्रकरणात १४ आरोपी होते. पण त्यातील एका आरोपीचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी १३ आरोपींना न्यायालयाने १३ आरोपींना खजूरबानी दारूकांडमध्ये दोषी ठरवलं. या प्रकरणी न्यायालयाने सर्व दोषींना मोठी शिक्षा सुनावली.

अमृताचं आयुष्य उद्ध्वस्त

अमृता यांचे वय आज ३५ वर्षे आहे आणि त्यांना दोन मुलं आणि दोन मुली आहेत. अमृता या आता आपल्या माहेरी आपल्या आई-वडिलांसोबत राहतात. त्यांच्या घरची परिस्थिती वाईट आहे. विषारी दारू प्यायल्याने १९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात अमृताचे पती अनिल राम यांचाही समावेश होता.

सरकारने दारूकांड प्रकरणातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये दिले. हा मदत निधी बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याला पीडित कुटुंबाला ९ रुपये बँकेकडून दिले जातात.

अनेक पीडित कुटुंबांना अद्याप मदत नाही

शशी चौहान या २८ वर्षीय तरुणाचा विषारी दारुने मृत्यू झाला. कुटुंबाने तरुण मुलगा गमावला. पण या पीडित कुटुंबाला अद्याप सरकारची मदत मिळालेली नाही. मुलगा गेल्यापासून घरात आजारपण आलं आहे, असं मृत शशीचे वडील विजय चौहान म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here