वाचा:
गेल्या आठवड्यात प्रशासनाकडून काही कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात शनिवार व रविवार वगळता सर्वकाही बंद ठेवण्याचे ठरले होते. याचे काही सकारात्मक परिणामही दिसून आले. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला बाधितसंख्या एक हजाराच्या खाली आली होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून यात पुन्हा वाढ झाली. कठोर निर्बंधांनंतर शहरात सुरू असलेले लग्न समारंभ, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम पूर्णपणे बंद झाले असले तरी बाजारपेठांमधील गर्दी कमी झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यातच निर्बंधात १४ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
वाचा:
हे राहणार सुरू
वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र, मीडिया संदर्भातील सेवा, दूधविक्री व पुरवठा, भाजीपालाविक्री व पुरवठा, फळेविक्री व पुरवठा, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, सर्वप्रकारच्या वाहतूक सेवा, बांधकामे, उद्योग व कारखाने, किराणा दुकाने (फक्त स्टॅण्डअलोन स्वरूपातील), चिकन, मटण, अंडी व मांस दुकाने, वाहनदुरुस्ती दुकाने, वर्कशॉप, पशुखाद्य दुकाने, बँक व पोस्ट सेवा.
हे असेल बंद
दुकाने, बाजारपेठा, मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट (प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील, मात्र, होम डीलिव्हरी व त्यासाठी किचन रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहू शकेल), सर्व खासगी कार्यालये, सर्व सरकारी कार्यालये (अत्यावश्यक सेवेशी संबंधिक कार्यालये वगळून)
वाचा:
लक्षात घ्या…
– नागपुरात १४ मार्चपर्यंत , शाळा, महाविद्यालये बंद.
– लॉकडाउन, नाइट कर्फ्यू नाही. मात्र, कठोर नियमावली राबविणार.
– शहरातील प्रमुख बाजारपेठा शनिवार, रविवारी बंद.
– धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम बंद.
– हॉटेलमध्ये ५० टक्के ग्राहकांना परवानगी.
– शहरातील हॉटेले व रेस्टॉरंट रात्री ९ वाजता बंद.
– मंगल कार्यालये, लॉन, रिसॉर्ट १४ मार्चपर्यंत बंद.
– केवळ अत्यावश्यक सेवा सुरू.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times