पुणे: जमिनींविषयक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन आणि नोंदणी प्रक्रियेबाबत नॅशनल काउन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च () या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये देशात राज्याने प्रथम स्थान पटकाविले आहे. राज्यात सात-बारा आणि आठ-अ (खाते उतारा) डाउनलोड करण्यात पुण्याने अव्वल स्थान मिळविले आहे. पुण्यानंतर अनुक्रमे औरंगाबाद आणि अकोला या जिल्ह्यांमधील नागरिकांनी उतारे डाउनलोड करून घेतले आहेत. ( )

वाचा:

‘एनसीएइआर’ या संस्थेने देशातील सर्व राज्यांमध्ये जमिनीविषयक कागदपत्रांचे डिजिटायझेशन आणि नोंदणी प्रक्रियेबाबत पाहणी करून त्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळविला आहे. या कामामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र हा पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे , , उत्तर प्रदेश, राज्यस्थान, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, कर्नाटक आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे.

वाचा:

प्रत्येक राज्यात डाउनलोड करण्यात आलेल्या सात-बारा आणि आठ (अ) या उताऱ्यांचीही माहिती घेण्यात आली. त्यानुसार राज्यात सर्वाधिक सात-बारा आणि आठ (अ) हे उतारे हे पुण्यातून डाउनलोड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यानंतर औरंगाबाद, अकोला, सोलापूर, जालना आणि नगर हे जिल्हे आहेत.

याबाबत ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप म्हणाले, ‘देशात महाराष्ट्राने जमिनींविषयक कागदपत्रांचे डिजिटायझेन करण्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. राज्यातील सुमारे दोन कोटी ५३ लाख सात-बारा उतारे हे संगणीकृत करण्यात आले आहेत. ई-फेरफार प्रकल्पाद्वारे राज्य सरकारला सहा कोटी रुपयांचा महसूल ही मिळाला आहे.’

वाचा:

‘राज्यात सात-बारा उतारे आणि खाते उतारे हे डाउनलोड करण्यात अव्वल स्थानावर आहे. राज्यामध्ये १७ डिसेंबर २०२० रोजी विक्रमी २९ हजार डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात-बारा आणि खाते उतारे डाउनलोड करण्यात आले. त्याचा फायदा शेतकरी, बँक आणि राज्य सरकारच्या विविध विभागांना मिळत आहे.’ असे जगताप यांनी स्पष्ट केले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here