सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास, देवळाली ते भुसावळ या शटल ट्रेनमधून प्रवास करताना एक तरुण प्रवासी परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानकादरम्यान तोल गेल्याने पडला. या घटनेनंतर सहप्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे रोखली. तोपर्यंत गाडीजवळपास एक किलोमीटर पुढे आली होती. या घटनेची माहिती होताच गार्ड व लोकोपायलटमध्ये चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी या जखमी तरुणाचे प्राण वाचवण्यासाठी जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत ट्रेन उलटी चालवण्याचा निर्णय घेतला.
घटनास्थळी तरुण जखमी अवस्थेत आढळून आला. त्यावेळी अपमार्गावरून जाणाऱ्या मालगाडीला थांबवण्यात आले. या मालगाडीमधून जखमी तरुणाला जळगाव येथे नेण्यात आले. आधीच निरोप आल्यामुळे जळगाव स्थानकात रुग्णवाहिका उभी होती. तातडीने जखमी तरुणावर उपचार झाल्याने त्याचे प्राण वाचले आहे. रेल्वेच्या गार्ड आणि मोटरमनने दाखवलेल्या संवेदनशीलतेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times