हा पुरस्कार नम्रतेने स्वीकारतो आणि तो भारताच्या जनतेला नावे करतो. यासह हा पुरस्कार पर्यावरण संरक्षणाच्या भारताच्या महान परंपरेला अर्पण करतो. अनेक दहशकांपासून भारतीय पर्यावरण संरक्षणात प्रमुख भूमिका बजावत आहेत. भारताची संस्कृती आणि प्रकृती हे खोलवर रुजले आहेत. महात्मा गांधी हे जगातील एक महान पर्यावरण संरक्षक होते. गांधींच्या मार्गावर हे जग चाललं तर मानवासमोर आज ज्या समस्या आहेत तेवढ्या राहणार नाहीत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पर्यावरण संरक्षणाचे दोन मार्ग आहेत. पहिला कायदे आणि धोरण बनवणं. याअंतर्गत भारताने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताद्वारे वीज निर्मिती क्षेत्रात ३६ टक्के वाढ केली आहे. संपूर्ण देशात एप्रिल २०२० पासून अधिक इंधन वाचवणाऱ्या भारत-६ मानकं लागू करण्यात आली आहेत. अर्थव्यवस्थेत गॅसचा वाटा वाढवून तो ६ टक्क्यांवरून १५ टक्के करण्यावर भर दिला जात आहे.
संपूर्ण देशात एलपीजी इंधनाचा विस्तार करायचा आहे. हायड्रोजन मोहीम आणि पीएम कुसम सारख्या योजना सरकारने पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने उचललेले पाऊल आहे. पर्यावरण संरक्षणाचा दुसरा मार्ग म्हणजे आपल्या व्यवहारात बदल करणं. कुठलीही वस्तू विचार न करता ती वाया घालवण्याची भारतीयांची परंपरा नाही. पण मोठ्या पातळीवर आपल्या व्यवहारात माफक पर्याय शोधण्याची गरज आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times