म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
बदलती जीवनशैली, प्रदूषणाचे दुष्परिणाम, शारीरिक व्याधींमुळे निर्माण होणारे इतर आजार हे केवळ चाळीशीनंतर उद्भवत नाहीत, तर राज्यात अशा प्रकारचे आजार असलेल्या तरुणांचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. त्यामुळे त्यांनाही प्रतिबंधासाठी लसीकरणाची सुविधा मिळायला हवी, अशी मागणी मुंबईकरांकडून होत आहे. आम्हालाही करोना प्रतिबंधासाठी लस मिळेल का, अशी विचारणा लसीकरण केंद्रावर केली जात आहे. लसीकरणासाठी निर्धारित केलेल्या वयोगटामध्ये ४५ वर्षांखालील व्यक्तींना लसीकरणाची सुविधा देण्यात आलेली नाही.

वाचा:

यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी ही मागणी योग्य असल्याचे सांगितले. आज देशात डायबेटीस असलेल्यांची संख्या सातत्याने वाढती आहे. लहान मुले, तरुण तसेच तिशीच्या आतील अनेकांना उच्च रक्तदाब, डायबेटीसचा त्रास आहे. त्यामुळे निर्माण होणारे शारीरिक गुंतागुंतीचे आजारही वाढते आहेत. त्यामुळे सहआजार असलेल्या या वयोगटांमध्ये लसीकरणाची सुविधा देणे अपेक्षित होते. राज्याच्या मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी लसीकरणाची सुविधा सहआजार असलेल्या या वयोगटामध्ये मिळायला हवी, या मागणीस दुजोरा दिला. मात्र, सध्या लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता टप्याटप्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाच्या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालिकेतील वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनी या टप्प्यांमध्ये विनाशुल्क लसीकरण पालिका, तसेच सार्वजनिक रुग्णालयांमध्ये देण्यात येत आहे. कोविनमध्ये जन्मतारखेची नोंद केली की, वयाची माहिती आपसूक कळते. त्यामुळे अॅपमध्ये या वयोगटातील व्यक्तींना सामावून घेतले जाणार नाही. मात्र, येत्या काळात सशुल्क वैद्यकीय सेवेअंतर्गत सहआजार असलेल्या चाळीशीखालील वयोगटात लसीकरण उपलब्ध होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली

ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य

लिव्हर सोरायसिस, सिकल सेल, रक्तपेशी तयार करणाऱ्या हाडातील मगजाच्या कार्यात बिघाड होणे, अस्थिमज्जेमध्ये रक्तपेशी तयार न होण्यामुळे हिमोग्लोबिन कमी होणे, बौद्धिक अकार्यक्षमता किंवा स्नायूंमध्य अपंगत्व निर्माण करणारा जन्मजात आजार, अपंगत्व, मूकबधिर व्यक्ती, दीर्घकाळ स्टिरॉइडस किंवा प्रतिकारप्रणाली कमी करणारी औषधे सुरू असलेल्या ४५ ते ५९ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, या सर्व आजारांचा समावेश हा बालकांसह चाळीशीच्या आतील व्यक्तींमध्येही असतो. त्यामुळे त्यांनाही लसीकरण करण्याची निकड डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी लसीकरणाचा कार्यक्रम राबवताना तातडीने गरज असलेल्या वयोगटामध्ये हा टप्पा पहिल्यांदा राबवला जातो. आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. स्थूलतेमुळे इतर आजारही उद्भवतात. त्यामुळे केवळ लठ्ठपणा हा घटकही विचारात घ्यायला हवा होता, असेही ते म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here