म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यात व त्यामुळे होत असलेल्या बालमृत्यूंचे प्रमाण नियंत्रणात आल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरीही प्रत्यक्षात तसे दिसत नाही. नव्या वर्षातील पहिल्या महिन्यात राज्यात ९९७ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. कोविड काळामध्ये राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण, अंगणवाड्यांतील रिक्त पदे आणि माता व बालकांमधील कुपोषणामुळे मुलांमध्ये वजन कमी असण्याचे तसेच पुढील टप्प्यात मृत्यू ओढवण्याचे प्रमाण कमी झालेले दिसत नाही. सरकारकडून कुपोषण आणि बालमृत्यूचा थेट संबंध नसल्याचाही दावा केला जातो. मात्र कुपोषित मुलांना विविध प्रकारचे आजार होऊन संसर्ग वाढल्यानंतर प्राण गमवावे लागतात, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

वाचा:

जानेवारी २०२१च्या आयसीडीएस मासिक अहवालानुसार, राज्यात पाच वर्षांखालील ६,१९,०९० कमी वजनाची बालके आढळून आली होती. यामध्ये ८५,५१७ तीव्र कमी वजनाची; तर ५,३३,५७३ बालके मध्यम कमी वजनाची होती. तीव्र कमी वजनाच्या प्रमाणात पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये नंदुरबार (१०,३९८), नाशिक (७,८६४), पालघर (६,१५४), गडचिरोली (४,२७५) आणि अमरावती (४,१५०) यांचा समावेश होता. मुंबई (४६,८१९), नाशिक (४६,२४९), नंदुरबार (४४,६१२), पालघर (३९,५५०) व ठाणे (३२,६६१) या जिल्ह्यांमध्ये एकूण कमी वजनाची बालके (मध्यम व तीव्र) असल्याचे दिसून आले आहे.

जानेवारी २०२१च्या अहवालानुसार एका महिन्यात ९९७ बालमृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ० ते १ वर्ष वयोगटातील ७८९ आणि १ ते ५ वर्षे वयोगटातील २०८ बालकांचा समावेश आहे. जुलै २०२०च्या महिला व बाल विकास विभागाच्या कॅस अहवालानुसार राज्यात ४८,१५४ तीव्र कुपोषित आणि १,७०,१६९ मध्यम कुपोषित अशी एकूण २,१८,३२३ बालके कुपोषित असल्याचे दिसून आले आहे.

रिक्त पदाचा प्रश्न

राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत (आयसीडीएस) अंगणवाडी ते तालुकाR स्तरावर १८,४४५ पदे रिक्त आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविका ५ हजार ३०८, मदतनीस ११ हजार ८८६,R पर्यवेक्षिका ९८९, बाल विकास प्रकल्प अधिकारी २६२ यांचा समावेश आहे.R

राज्याचे चित्र

जिल्हा वजन केलेली एकूण बालके साधारण श्रेणी मध्यम कमी वजन तीव्र कमी वजन कमी वजनाची मुले

नंदुरबार १,३३,९६७ ८९,३५५ ३४,२१४ १०,३९८ ४४,६१२

नाशिक ३,७३,१५२ ३,२६,९०३ ३८,३८५ ७,८६४ ४६,२४९

पालघर १,७१,१०८ १,३१,५५८ ३३,३९६ ६,१५४ ३९,५५०

गडचिरोली ८१,०८१ ६०,७०२ १६,१०४ ४,२७५ २०,३७९

अमरावती १,७२,८५६ १,४७,७२० २०,९८६ ४,१५० २५,१३६

मुंबई २,८५,७०८ २,३८,८८९ ४२,७०८ ४,१११ ४६,८१९

ठाणे २,४५,४०५ २,१७,४४२ २८,७२५ ३,९३६ ३२,६६१

औरंगाबाद २,४६,६११ २,२२,७१३ २०,०२५ ३,८७३ २३,८९८

पुणे ३,८१,०५९ ३,५६,०५८ २२,५०५ २,४९६ २५,००१

नागपूर २,२६,८५६ २,०३,५३७ २१,२७५ २,०४४ २३,३१९

चंद्रपूर १,२१,७९४ १,०७,७६७ ११,९९२ २,०३५ १४,०२७

गोंदिया ८९,५४६ ७८,८३१ ८,९१६ १,७९९ १०,७१५

रायगड १,३६,४७३ १,३१,३९९ ४,३४० ७३४ ५,०७४

एकूण ६१,३१,४१४ ५५,१२,३२४ ५,३३,५७३ ८५,५१७ ६,१९,०९०

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here