नवी दिल्ली: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर क्रिकेटमधील अनेक विक्रमांची नोंद आहे. सर्वाधिक धावांपासून ते सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. क्रिकेटमधील या विक्रमविराने आता सर्वांना एक विक्रम करण्यासाठी आवाहन केले आहे.

येत्या २१ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी महिलांचा टी-२० वर्ल्ड कप सुरू होत आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना ८ मार्च रोजी मेलबर्न मैदानावर होणार आहे.

वाचा-

या मैदानाची क्षमता १ लाख इतकी आहे. सचिन सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आवाहन केले आहे. मेलबर्नवर होणारी फायनल ही सर्वांना लक्षात राहिल अशी करूया असे सचिनने म्हटले आहे. सचिनने आयसीसीच्या टी-२० वर्ल्ड कपने शेअर केलेला एक ट्विट रिशेअर केला आहे. या ट्विटमध्ये आयसीसीने फायनल मॅच ही महिला क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा इव्हेंट करावा असे आवाहन केले आहे. या सामन्यात प्रेक्षकांची सर्वाधिक उपस्थितीचा विक्रम करूया असे देखील आयसीसीने म्हटले आहे.

वाचा-

आयसीसीचे या आवाहनाला सचिनने पाठिंबा देत सर्व क्रिकेट चाहत्यांना या फायनल सामन्याला उपस्थित राहून विक्रम करण्यास सांगितले आहे.

याआधी १९९९ साली झालेल्या फिफा महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनल सामन्यासाठी ९० हजार १८५ प्रेक्षक मैदानात उपस्थित होते. हा विक्रम मेलबर्न मैदानावर मोडला जावा यासाठी आयसीसी प्रयत्न करत आहे. अमेरिकेची पॉप स्टार केटी पेरीने MCG वर होणाऱ्या सामन्याच्या आधी कार्यक्रम सादर करणार असल्याचे म्हटले आहे.

वाचा-

आयसीसीने स्पर्धेसाठी दोन ग्रुप केले असून भारतीय संघाचा समावेश ए ग्रुपमध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश यांचा समावेश आहे.

स्पर्धेतील भारताच्या लढती
२१ फेब्रुवारी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२४ फेब्रुवारी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२७ फेब्रुवारी- भारत विरुद्ध न्यूझीलंड
२९ फेब्रुवारी- भारत विरुद्ध श्रीलंका

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here