चित्रा वाघ यांनी ट्विट करत ही अपेक्षा व्यक्त केली आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन… प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य… आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी… सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?.’
मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवा; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी पोलिस करत असलेल्या तपासावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. सरकार बदलत असते पण मुंबई पोलिस तेच असतात. त्यांची कार्यपद्धती अतिशय चांगली आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राजकारण करण्यासाठी विरोधकांनी विरोध केला असला तरी पोलिसांवर सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे, असेही ते म्हणाले. हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास आता एटीएसकडे दिला आहे. त्यामुळे तो योग्य पद्धतीनेच होणार, याच शंका घेण्याचे कारण नाही. पोलिसांवर आरोप करणे चुकीचे आहे, असही थोरात म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times