मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने परिसरात मुंबईतील सर्वात मोठे उभारण्याचे काम आजपासून सुरु झाले आहे. तब्बल १११ शौचकूपांसह आंघोळीची व कपडे धुण्याची देखील अत्याधुनिक व यांत्रिक सुविधा असणाऱ्या या सुविधा केंद्राचे भूमिपूजन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते आज झाले. ( )

वाचा:

या सुविधा केंद्राची उभारणी ‘हिंदुस्तान युनिलिव्हर’ या कंपनीच्या ‘सामाजिक उत्तरदायित्व निधी’मधून (CSR Fund) करण्यात येणार असून यासाठी सुमारे ९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच ‘युनायटेड वे मुंबई’ या संस्थेचेही सहकार्य या सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी मिळाले आहे. पुढील सहा महिन्यांत धारावीकरांच्या सेवेत रुजू होणाऱ्या या सुविधा केंद्राचा परिसरातील सुमारे ५ हजार व्यक्तींना लाभ होईल, अशी माहिती महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.

वाचा:

सुविधा केंद्राबद्दल ठळक माहिती:

१. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आव्हानात्मक परिसरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वच्छतेच्या अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करीत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी सामुदायिक शौचालयांची व सुविधा केंद्रांची उभारणी महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असते. सुविधा केंद्रांमध्ये शौचालयाच्या सुविधा सोबतच अत्याधुनिक यांत्रिक पद्धतीने कपडे धुण्याची सुविधा, आंघोळीची सुविधा इत्यादी बाबी देखील उपलब्ध करून देण्यात येतात.

२. मधील आझाद नगर परिसरात २०१६ मध्ये पहिले सुविधा केंद्र उभारण्यात आले होते. आता महानगरपालिका क्षेत्रातील सहावे सुविधा केंद्र धारावी परिसरात उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे सुविधा केंद्र मुंबईतील सर्वात मोठे सुविधा केंद्र ठरणार आहे. या सुविधा केंद्रात १११ शौचकूप, ८ स्नानगृह आणि कपडे धुण्यासाठी १० मोठ्या आकाराची यंत्रे असणार आहेत.

३. सुमारे २ हजार ६०० चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या व तीन मजली असणाऱ्या (G + 2) या भव्य सुविधा केंद्रामध्ये स्त्री, पुरुष, दिव्यांग, लहान मुले यांच्यासाठी स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणार आहेत. तसेच हे सुविधा केंद्र गंध मुक्त असेल याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

४. या सुविधा केंद्रातील स्नानगृहाचा लाभ घेणाऱ्यांना साबणाची वडीही दिली जाणार असून आंघोळ करताना गरम पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सुविधा केंद्राच्या वर वैशिष्ट्यपूर्ण सोलर पॅनल बसविले जाणार आहेत.

५. अधिकाधिक पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने सौर ऊर्जेचा वापर करण्यासोबतच या सुविधा केंद्रातील वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर होण्याच्या दृष्टीने प्रक्रिया केंद्र देखील कार्यान्वित केले जाणार आहे.

६. या सुविधा केंद्राचा लाभ घेणाऱ्यांना प्रति लिटर पाण्यासाठी केवळ एक रुपया शुल्क आकारले जाणार असून परिसरातील नागरिकांना केवळ १५० रुपयांत कौटुंबिक मासिक पास दिला जाणार आहे. यामध्ये कुटुंबातील ५ व्यक्तींना निर्धारित सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी लहान मुलांना मोफत प्रवेश असणार आहे. त्याचबरोबर यांत्रिक पद्धतीने कपडे धुण्याची सुविधा (Laundry Facility) देखील या सुविधा केंद्रात अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here