मुंबई: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावर () सर्वांचे लक्ष केंद्रित झालेले असताना भारतीय जनता पक्षाने महिला अत्याचार हा मुद्दा विस्मृतीत जाऊ नये यासाठी आघाडी उघडलेली दिसत आहे. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ट्विट करताना भारतीय जनता पक्षाच्या राज्य उपाध्यक्षा () यांनी ट्विट करत मागील घटनांबाबत उल्लेख केला. त्यानंत आता भाजपच्या महिला आमदार (Shweta Mahale) यांनीही एक ट्विट करत राज्य सरकारवर जोरदार टीकेचे प्रहार केले आहेत. ( goes harsh on maharashtra government)

आमदार श्वेता महाले यांनी उपहासात्मक टिप्पणी केली आहे. महाले आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘पूजा चव्हाणने आत्महत्या केली, हिरेन मनसुखने आत्महत्या केली, जळगावच्या त्या महिलेने गर्मी लागत होती म्हणून झगा काढून ठेवला होता. ज्यांच्यावर बलात्कार झालेत त्यात त्या महिलांची चुकी आहे, मुंडे, शेख, वाघमारे, राठोड अगदी निरागस आहेत आणि राज्याला धोका सचिन, लतादीदी, अमिताभ, अक्षयकडून आहे.’

‘मनसुख हिरेन प्रकरणात पुरावे नष्ट होण्याची शक्यता’

आमदार श्वेता महाले यांनी आणखी एक ट्विट करत मनसुख हिरेन प्रकरणात पुरावे नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे जाईपर्यंत सर्व पुरावे नष्ट होण्याची शक्यता अधिक, मग कुठलीही यंत्रणा लावा, फार काही निष्पन्न होणार नाही, असे आधीच्या सुशांत आणि दिशा प्रकरणावरून लक्षात येऊ शकेल. त्यामुळे चार दिवस वृतवाहिन्यांना टीआरपी मिळेल, एवढेच काय ते यातून निष्पन्न होईल असे आमदार श्वेता महाले यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटमध्ये महाले यांनी देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

भाजपच्या राज्य उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी पूजा चव्हाण,मनसुख हिरेन अशा प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल का असा सवाल उपस्थित करत शंका उपस्थित केली आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन… प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य… आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी… सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here