कोल्हापूर: सहा वर्षांपूर्वी कोल्हापुरात झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील नऊ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी ही शिक्षा सुनावली. ( )

वाचा:

केल्हापुरात २०१४ मध्ये घडलेल्या दुहेरी खून प्रकरणाने खळबळ माजली होती. २ फेब्रुवारी २०१४ रोजी टेंबलाईवाडी उड्डाणपूल परिसरात व यांचा पाठलाग करून खून करण्यात आला होता. आरोपींनी तलवार, चाकू व दगडांचा वापर करून खून केल्याचे चौकशीत सामोरे आले होते. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुहेरी खून खटल्यामुळे संपूर्ण शहर हादरले होते.

वाचा:

नितीन महादेव शिंदे व समीर सिराज खाटिक यांच्या खूनातील आरोपी जयदीप चव्हाण, साहिल कवाळे, रियाज देसाई, सागर गिरी, फारुक अहमद शेख, सद्दाम हुसेन देसाई, इम्रान मुजावर, धनाजी मिसाळ, रोहित सुधीर कांबळे यांच्याविरुद्ध खटला चालला आणि आज या सर्वांना शिक्षा झाली आहे. सर्व आरोपी हे विक्रमनगर व टेंबलाईवाडी परिसरातील आहेत. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक वकील एम. बी. पाटील यांनी काम पाहिले. या खटल्यात एकूण ३४ साक्षीदार तपासले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here