अमरावती: करोनाने पुन्हा डोके वर काढल्यानंतर ११ दिवसांपूर्वी लागू करण्यात आलेला अमरातवतील (Lockdown) आता शिथिल करण्यात आला आहे. अमरावतीतील लॉकडाउन शिथिल होत असल्याचा आदेश जारी झाल्यानंतर सर्व प्रकारची दुकाने आजपासून सुरू झाला. यामुळे बाजारपेठांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसू लागले आहे. अमरावतीत शनिवारी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बाजारपेठा सुरू ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे. ()

अमरावतीतील लॉकडाउन शिथिल करण्यात आला असला तरी देखील करोनाची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी ‘कोविड ॲप्रोप्रिएट बिहेव्हिअर’ म्हणजेच मास्क वापरणे, हात स्वच्छ करणे आणि शारीरिक अंतर पाळणे अशा नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. हे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला आहे.

नो मास्क-नो एंट्रीचे पालन आवश्यक

करण्यात आला असला तरी नो मास्क-नो एंट्रीचे पालन करणे दुकानदारांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे ग्राहकांना खरेदी करायची असल्यास घराजवळली दुकानांची निवड करून लांबचा प्रवास टाळावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

लग्नसमारंभात २० व्यक्तींनाच परवानगी

लग्न समारंभासाठी फक्त २० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानी देण्यात आली आहे. मात्र समारंभाला उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींना अँटिजेन टेस्ट करणे आवश्यक आहे.

क्लिक करा आणि वाचा-

उपहारगृहे पार्सल देऊ शकणार
लॉजिंग व्यावसायिकांना क्षमतेच्या २५ टक्के मर्यादित व्यवसाय चालवता येणार आहे. असे असले तरी ग्राहकांची कक्षात जेवणाची व्यवस्था करणे, खाद्यपदार्थ सीलबंद असावे, असे नियम पाळावे लागणार आहेत. नियम न पाळण्यास लॉज ५ दिवस सील करून १५ हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच उपहारगृहे, हॉटेल, खाद्यगृहांमध्ये सकाळी ९ ते ५ या वेळेत पार्सल सुविधा पुरवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

‘लॉकडाउन पुन्हा नको’
लॉकडाउनमुळे गरिबांचे, कर्मचाऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन लागू व्हायला नको, अशी प्रतिक्रिया अमरावतीतील व्यवसायिक नागेश पाटील यांनी व्यक्ती केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here