ठाणे: मुंबईत उद्योगपती यांच्या घराजवळ स्फोटकांसह पार्क करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारचे मलाक यांचा शुक्रवारी मुंब्रा रेतीबंदर येथे खाडीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज मनसुख यांचा शवविच्छेदन अहवाल मिळाला असून त्यात मृतदेह सापडल्याच्या सुमारे १२ ते १४ तास आधी मनसुख यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. ( )

वाचा:

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर स्कॉर्पिओ स्फोटकं प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. याप्रकरणी शुक्रवारी विधानसभेत तीव्र पडसाद उमटले होते. विरोधी पक्षनेते यांनी मुंबई क्राइम ब्रांचमधील पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव घेत अनेक प्रश्न उपस्थित केले होते व याप्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर सरकारकडून गृहमंत्री यांनी सभागृहात निवेदन दिले व नंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रांचकडून एटीएसकडे देण्याची घोषणा केली. दरम्यान, मनसुख यांचा कुटुंबीयांनी याप्रकरणी जी आपली बाजू मांडली आहे त्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनले आहे. माझे पती आत्महत्या करूच शकत नाहीत, असा दावा करत मनसुख यांची पत्नी यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यामुळेच मनसुख यांचा शवविच्छेदन अहवाल या सगळ्यात महत्त्वाचा ठरला होता. त्याची प्रतीक्षा आता संपली असून हा अहवाल आता आला आहे व त्यात काही बाबी स्पष्ट झाल्या आहेत.

वाचा:

मनसुख हिरेन यांचा मृत्यू मृतदेह सापडण्याच्या १२ ते १४ तास आधी मृत्यू झाला आहे. त्यांच्या शरिरावर कोणत्याही प्रकारच्या गंभीर इजा नाहीत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मनसुख यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे यातून स्पष्ट झालेले असून आता केमिकल अॅनलिसिसमधून पुढील बाबी स्पष्ट होतील, असे सांगण्यात येत आहे. मनसुख यांचा व्हिसेरा मुंबईत कालिना येथील फॉरेन्सिक सायन्सेस लॅबोरेटरी येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येणार, असे ठाणे पोलिसांनी स्पष्ट केले.

वाचा:

दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय मनसुख यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका त्यांच्या कुटुंबीयांनी घेतली होती. त्यामुळे अहवाल आल्यानंतर सहाय्यक उपायुक्त अविनाश अंबुरे हे हिरेन यांच्या घरी पोहचले व त्यांनी अहवाल कुटुंबीयांना दाखवला. आता काही वेळापूर्वीच मनसुख यांचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला असून ठाण्यातील जवाहर बाग येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here