न्यूयॉर्क- हॉलिवूड अभिनेता नेहमीच चर्चेत असतो. यावेळी पाचव्यांदा लग्न केल्यामुळे तो चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे वयाच्या ५७ व्या वर्षी २६ वर्षीय प्रेयसी रिको शिबातीशी लग्न केलं. हे त्याचं पाचवं लग्न आहे. सिनेमात मुख्य भूमिका साकारणार्‍या निकोलस केजने १६ फेब्रुवारी रोजी लग्न केलं.

निकोलस केज आणि यांचं लग्न लास व्हेगासमधील एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडलं. लग्नात केवळ ठराविक लोक उपस्थित होते. खास गोष्ट म्हणजे या लग्नात निकोलसच्या आधीच्या लग्नाच्या चार पत्नीही उपस्थित होत्या. लग्नाच्या जवळपास एक महिन्यानंतर निकोलसने रिकोसोबतचे लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.

सध्या चाहत्यांमध्ये दोघांच्या लग्नाची चर्चा आहे. विशेष म्हणजे अमेरिकन आणि जपानी संस्कृती पद्धतीने दोघांचं लग्न झालं. रिकोने तिच्या लग्नात पारंपारिक जपानी किमोनो घातला होता. त्याच वेळी निकोलसने काळ्या रंगाच्या टक्सिडोला प्राधान्य दिलं होतं. या लग्नाचे जे फोटो समोर आले त्यात रिकोने किमोनो घातला तर आहेच शिवाय केस मोकळे सोडले आहेत. तसंच लाल रंगाची लिपस्टिक लावत आपला ब्रायडल लुक पूर्ण केला आहे.

यावेळी तिने सोनेरी रंगाच्या आयशॅडोही वापरल्या होत्या. तिच्या हातात एक पिवळसर रिबन असलेला पुष्पगुच्छ होता. त्याच वेळी निकने त्याच्या टक्सिडो आणि जॅकेटवर पिवळा गुलाब लावला होता. हा गुलाब रिकोच्या पुष्पगुच्छाशी मॅचिंग होता.

असं सांगितलं जात आहे की निकोलसने १६ फेब्रुवारी हाच दिवस लग्नासाठी निवडला कारण त्याला आपल्या दिवंगत वडिलांचा वाढदिवस खास बनवायचा होता. निकोलस केजचे वडील ऑगस्ट कोपला एक प्रसिद्ध लेखक होते. त्यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९३४ रोजी झाला होता. २००९ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here