म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर

शिर्डीतील बुंदी लाडूचा पुन्हा सुरू करण्यात आला असून आता दर्शन रांगेतच भाविकांना हा प्रसाद मोफत देण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात बंद झालेला हा वैशिष्टयपूर्ण प्रसाद शनिवारपासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. दर्शन घेऊन परतणाऱ्या प्रत्येक भक्ताला ५० ग्रॅम वजनाचा एकच लाडू देण्यात येणार आहे. ( in sai baba mandir started again)

लॉकडाऊननंतर मंदीर पुन्हा खुले झाले असले तरी हा प्रसाद सुरू करण्यात आला नव्हता. तो सुरू करण्याची भाविकांची मागणी होती. मधल्या काळात काही खासगी विक्रेत्यांनी असे लाडू तयार करून साईप्रसाद म्हणून विकण्यास सुरवात केली होती. शिर्डीतील या वैशिष्टयपूर्ण प्रसादाची सवय झालेले भाविक ते खरेदी करीत होते.

आता शिर्डीच्या संस्थाननेच हा लाडूचा प्रसाद पुन्हा सुरू केला आहे. सुधारित पद्धतीने तयार करण्यात आलेला हा प्रसाद मोफत देण्यात येत आहे. करोनाचे सर्व नियम पाळून प्रयोगिक तत्वावरहा उपक्रम सुरू करण्यात आला असून त्यात आवश्यक ते बदल करण्याचा पर्याय खुला असल्याचे सांगण्यात आले.

साईबाबा संस्‍थानमार्फत १९९० पासून शिर्डीत येणाऱ्या साईभक्‍तांना हा प्रसाद विकत दिला जात होता. तिरुपती देवस्थानाच्‍या धर्तीवर साजुक तुपातील व खिसमीस, काजू, बदाम, विलायची घालू बुंदीचा लाडू तयार केले जात होते. त्यानंतर २०१३ पासून दर्शन रांगेत भक्तांना पन्नास ग्रॅम वजनाचा एक लाडू मोफत दिला जाऊ लागला. करोना काळात मंदीर बंद झाल्यापासून ही पद्धत बंद झाली होती. सशुल्क आणि मोफत दोन्ही प्रकराचे लाडू बंद झाले होते. भाविकांची मागणी लक्षात घेता आता पुन्हा या लाडूंचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. शनिवारी (६ मार्च) पासून दर्शन रांगेतील मोफत लाडू वाटप पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी येणा-या भक्‍तांना दर्शन झालेनंतर दर्शनरांगेतच ५० ग्रॅम वजनाचा १ बुंदीचा लाडू प्रसादरूपाने पाकिटातून मोफत दिला जात आहे. हा लाडू शास्‍त्रोक्‍त पध्‍दतीने तयार करण्‍यात येत असून त्‍याचा वापर २४ तासांच्या आतच करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here