पुणे शहरात अॅक्टिव्ह म्हणजे जे उपचार घेत आहेत, अशा रुग्णांची संख्या ६ हजार ४६० इतकी आहे. त्यांपैकी ३२१ रुग्ण गंभीर आहेत. या बरोबरच एकूण ६७२ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
पुण्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २, लाख ०७ हजार ३४६ इतकी आहे. तर आतापर्यंत पुण्यात करोनाने झालेल्या मृत्यूंची संख्या ४ हजार ८८५ इतकी आहे. पुण्यात आतापर्यंत एकूण १ लाख ९६ हजार १ इतके रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत एकूण ७ हजार ६०९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित शुक्रवारी, १२ मार्च या दिवशी एक बैठक आयोजित करण्यात येत आहे. या बैठकीत पुणे जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची आणि करोनामृत्यूंची संख्या वाढली असल्याने कोणत्या प्रकारचे निर्बंध लावायचे, याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शाळा आणि महाविद्यालये १४ मार्चनंतरही बंद ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
सौरभ राव यांनी माहिती देताना सांगितले की, आयसर आणि टीसीएस या संस्थांनी शाळा आणि महाविद्यालये ही १४ मार्चनंतरही बंद ठेवण्याची शिफारस केली आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना फार त्रास होणार नाही, असे ते म्हणाले. मात्र, दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत नियोजन केले जाणार असल्याचे ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times