कोल्हापूर: सत्तेचा गैरवापर करत पालकमंत्री यांनी महापालिकेचा १५ कोटींचा घरफाळा बुडवल्याचा आरोप माजी खासदार व भाजपचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते यांनी केला. व डीवायपी मॉलमधील तीस मिळकती या भाडेकरारावर दिल्या असताना त्यांचा स्वमालकी वापर दाखवून त्यांनी ही फसवणूक केली आहे, असे महाडिक म्हणाले. सत्तेचा गैरवापर करत पालकमंत्री पाटील हे चांगल्या संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही महाडिक यांनी केला. ( )

वाचा:

‘पालकमंत्री सतेज पाटील हे हॉटेल सयाजीचे मालक आहेत. त्यांनी या हॉटेलमधील अनेक गाळे भाड्याने दिले आहेत. भाड्याने दिलेल्या मिळकतींना जादा घरफाळा असतो. तो बुडविण्यासाठी त्यांनी हे गाळे आपणच वापरत असल्याचे सांगत १५ कोटींचा घरफाळा दिला नाही. याबाबत प्रशासनाला अनेकदा कळवूनही प्रशासन काहीच कारवाई करत नाही. महापालिकेवर पालकमंत्री पाटील यांची सत्ता आहे. त्यामुळे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत’, असे नमूद करत येत्या आठ दिवसात दंड व्याजासहित संपूर्ण रकमेची वसुली केली नाही तर महापालिकेसमोर उपोषण करणार आहे, असा इशारा महाडिक यांनी दिला.

वाचा:

‘कसबा बावडा रोडवरील ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कचे शून्य घरफाळा बिल दाखविले आहे. ड्रीम वर्ल्डचा २००२ पासूनचा जवळपास एक कोटी रुपयांचा घरफाळा आहे. ती वसूल न केल्यास रस्त्यावरची लढाई सुरू करू, प्रसंगी न्यायालयात जाऊ’, असा इशारा देताना जोपर्यंत कोल्हापूर प्रशासन पालकमंत्री पाटील यांच्याकडून १५ कोटी रुपयांची घरफाळयाची वसुली करत नाही, तोपर्यंत जनतेने घरफाळा भरू नये, असे आवाहन महाडिक यांनी कोल्हापूरकरांना केले.

वाचा:

गोकुळ दूध संघाची निवडणूक लवकरच लागण्याची शक्यता आहे. ती लढविण्याची तयारी पालकमंत्री पाटील करत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना महाडिक म्हणाले, हा दूध संघ आशिया खंडात चांगला आहे. संघाचा कारभार योग्यरित्या सुरू असताना पालकमंत्री पाटील हे केवळ स्वत:च्या राजकारणासाठी निवडणूक लढवित आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांना सत्ता हवी आहे. महापालिकेत सत्ता हवी, जिल्हा परिषदेत हवी, आमदारकी हवी, मंत्रीपद, पालकमंत्रीपद सगळयाच गोष्टी त्यांना हव्या आहेत. दुसऱ्यांच्या चांगल्या चाललेल्या संस्था मोडीत काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पत्रकार परिषदेला माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम, राजसिंह शेळके, महेश वासुदेव, संग्राम निकम, मारुती माने आदी उपस्थित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here