म. टा. प्रतिनिधी,

जामीन अर्जावरील बाजून म्हणणे देण्यासाठी एकाकडून एक लाखांची घेताना कामशेत पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकासह सहाय्यक निरीक्षक आणि शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी पकडले. एकाच पोलिस ठाण्यातील तिघांना लाच प्रकरणात पकडण्यात आल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. ( for accepting of rs 1 lakh)

कामशेत पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलिस शिपाई महेश दौंडकर यांच्याविरोधात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लाचप्रकरणातील तक्रारदार यांच्या मामाविरोधात कामशेत पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याने याप्रकरणात जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावर पोलिसांकडून न्यायालयात म्हणणे (से) मांडण्यात येणार होते.

जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी पोलिस निरीक्षक चौधरी यांच्यासह सहाय्यक निरीक्षक कदम यांनी तक्रारदाराकडे पाच लाखांची लाच मागितली होती. तक्रारदाराने अडीच लाख रुपये दिले होते. त्यानंतर पुन्हा अडीच लाख रुपये देण्यासाठी तक्रारदारांकडे तगादा लावला होता.

क्लिक करा आणि वाचा-

ने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांनी तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शनिवारी दुपारी सापळा रचून एक लाखांची लाच घेताना तिघांना पकडण्यात आले. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here