सातारा: येथील कुख्यात गुंड याला जिल्ह्यातील तालुक्यातील मेढा येथे अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ( )

वाचा:

तळोजा जेल मधून सुटका झाल्यानंतर गजा मारणे याने जेलबाहेर शक्तिप्रदर्शन केले होते व गाड्यांचा ताफा तसेच समर्थकांसह पुण्याकडे जाताने त्याने महामार्गावर धुडगूस घातला होता. या गाड्यांचा टोलही भरण्यात आला नव्हता. या प्रकरणी पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला पुन्हा अटक करण्यासाठी विशेष यंत्रणा लावली होती मात्र पोलिसांना गुंगारा देत गजा मारणे हा फरार झाला होता.

वाचा:

गजा मारणे याचे गेले काही दिवस मेढा, महाबळेश्वर, वाई परिसरात वास्तव्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यात आज जावळी तालुक्यातील मेढा परिसरात मारणे आला असल्याची खात्रीशीर खबर पोलिसांना लागल्यावर तिथे सापळा रचण्यात आला. मेढा शहरात मारणे डस्टर गाडीतून आला असताना पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. मारणे हा डस्टर गाडीतूनच मेढ्यात फिरत होता. हा मारणेच आहे याची खात्री पटल्यावर फिल्मी स्टाइलने अटकेची कारवाई करण्यात आली. मेढा पोलिसांनी मारणेला प्रथम शरण येण्याची सूचना केली. त्यानंतर अगदी शिताफीने त्याला अटक करण्यात आली.

वाचा:

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. कुख्यात गजानन मारणे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे आणि मारणेवर एमपीडीएनुसार कारवाई करण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षक यांची सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here