वाचा:
लसीकरणाचा सध्या तिसरा टप्पा सुरू आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच सहआजार असलेल्या ४५ ते ५९ वर्षे या वयोगटातील व्यक्तींना या टप्प्यात करोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. मुंबईत पालिकेने यासाठी अधिकृत लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. त्यासोबतच २९ खासगी रुग्णालयांतही लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. या सर्वच ठिकाणी सध्या युद्धपातळीवर लसीकरण केले जात आहे. दरम्यान, मुंबईत उद्याचा दिवस लसीकरण होणार नाही, असे आज पालिकेने स्पष्ट केले आहे.
वाचा:
‘रविवार, दिनांक ७ मार्च २०२१ रोजी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण होणार नाही, याची कृपया सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी’, असे ट्वीट पालिकेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर करण्यात आले आहे.
ही आहेत मुंबई महानगरपालिकेची कोविड लसीकरण केंद्रे
१. बीकेसी जंबो कोविड सेंटर, वांद्रे
२. मुलुंड जंबो कोविड सेंटर, मुलुंड
३. नेस्को जंबो कोविड सेंटर, गोरेगाव
४. सेव्हन हिल्स हॉस्पिटल, अंधेरी
५. दहिसर जंबो कोविड सेंटर, दहिसर
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times