वाचा:
अनुराग कश्यप, तापसी पन्नू व त्यांचे भागीदार यांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थानांवर प्राप्तीकर विभागाकडून छापे टाकण्यात आले आहेत. हे छापे हेतुपुरस्सरपणे टाकण्यात आल्याची टीका करण्यात येत आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी मतप्रदर्शन केले. या सर्व प्रकरणांमधून सुमारे ६५० कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता उघडकीस आल्याची माहिती प्राप्तीकर विभागाने दिली आहे. त्यामुळे ही कारवाई हेतुपुरस्सरपणे करण्यात आलेली नाही, असे दिसून येत आहे, असे पाटील म्हणाले. जे आता अशा सरकारी कारवाईच्या विरोधात ओरड करीत आहेत ते गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री यांची सीबीआय ६-६ तास चौकशी करीत होते तेव्हा का गप्प होते?, असा सवालही पाटील यांनी केला. पंतप्रधान मोदी हे नेहमीच सत्याच्या सोबत उभे राहिले. ते कधीही डगमगले नाहीत. त्यामुळेच असे प्रामाणिक पंतप्रधान देशाला लाभले हे येथील जनतेचे भाग्य असल्याचेही पाटील म्हणाले.
वाचा:
भाजप सरकार फक्त उद्योगपतींच्या हितासाठी काम करणारे सरकार असल्याची ओरड नेहमीच विरोधकांकडून होत असल्याबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, अनिल अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्स एंटरटेनमेंट विरुद्ध सुद्धा सरकारी कारवाई करण्यात येत आहे, त्यामुळे विरोधक गोंधळलेल्या अवस्थेतून असे आरोप करत आहेत. आपले अपयश झाकण्यासाठी लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा अयशस्वी प्रयत्न आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times