अमरावतीः विना परवानगी गाई ढोरांची कत्तल घडवून अवैधरित्या मास विक्री व्यवसाय चालविणाऱ्या कत्तलखान्यांपैकी एका कत्तलखान्यात धाड टाकून ३ बैल, २ गाई आणि एका वासरास जीवदान मिळवून देणाऱ्या धारणी पोलीसांकडून धारदार शस्त्र साठ्यांसह एका कसायास रंगेहात अटक करण्यात आली असून एक कसाई ‘हातावर तूरी देवून फरार’ झाल्याचे वृत्त आहे.

विना परवानगी गाई ढोरांची कत्तल घडवून खुलेआम मांस विक्री व्यवसाय चालविण्यात येत असल्याची गुप्त माहीती ठाणेदार विलास कुलकर्णी यांना मिळाली होती. त्याच माहीतीच्या आधारावर सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर, पी.एस.आय. मंगेश भोयर,पी. एस. आय. सुयोग महापूर, पी. एस. आय. करुणा मोरे व ईतर २० पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकांकडून कुरैशी मोहल्ल्यात रेड टाकून तेथील एका कत्तलखान्यास उधळून लावण्यात आले आहे. पहाटे ५ वाजता पोलिसांनी धारणीच्या कसाई मोहल्ल्यातून ही कारवाई केली आहे. कत्तलखान्यातून वजन काटे, संत्तूर, सुरे, कुऱ्हाड, बसुले अश्या धारदार शस्त्रसाठ्यांसह एका कसाई व्यवसायकास रंगेहात अटक करण्यात आली असून त्याचा दुसरा साथीदार मात्र घटनास्थळाहून फरार झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून धारणी शहरात काही कसाई हे गाई ढोरांची कत्तल घडवून विना परवानगी मास विक्री व्यवसाय चालवित असून अलीकडे मास विक्री व्यवसायास महापूर आल्याचा दिसून येत होता. काही सुज्ञ व सुजाण नागरिकांकडून या अवैध व्यवसायावर कायमस्वरुपी पायबंद घालता यावा यासाठी धारणी पोलीसांकडे ओरड सुरु करण्यात आली होती. कत्तलखान्यातून जीवदान देण्यात आलेल्या पाळीव जनावरांची सरासरी किंमत १ लाख ५० हजार आकारण्यात आली असून जप्त करण्यात आलेल्या धारदार शस्त्रसाठ्याची किंमत १५,००० रुपये असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह अब्दुल रज्जाक शेख हुसैन कुरैशी ( ४५ ) यास अटक करण्यात आली असून फरार आरोपी अब्दुल जहीर शेख हूसैन कुरैशी याचा शोध घेण्यात येत आहे.

धारणी पोलीसांकडून दोन्ही आरोपीविरुद्ध भादंवी कलम ५.५ ( ब ) , ९, ११, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १७७, सुधारणा कायदा २०१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय काळे व पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पूढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर व त्यांच्या अधिनस्त चमूकडून करण्यात येत आहे. धारणी पोलीसांकडून आरोपी अब्दुल रज्जाक शेख हूसैन कुरैशी यास धारणी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयापूढे हजर करण्यात येणार असून पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे.

अवैध कत्तलखान्याचे अखेर बिंग फूटले!

वॉर्ड नं. १३ मध्ये कुरैशी समुदायी समाजाकडून शहरात विना परवानगी कत्तलखाने थाटण्यात आले असून गौवंश प्राण्यांच्या बेसुमार कत्तली निर्दयीपणे करण्यात येत होत्या. ही सदर कार्यवाहीतून उघडकीस आली असून असून कत्तलखाने चालविणाऱ्यांचे सरेआम बिंग फुटल्यामुळे कुरैशी समुदायांसह त्यांना राजकीय पाठबळ पुरविणाऱ्या काही हितचिंतकांमध्ये एकच खळबळ उडालेली दिसून येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here