नगर: श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथून सहा दिवसांपासून झालेल्या या व्यावसायिकाचा मृतदेह परिसरात रेल्वेमार्गाच्या कडेला रविवारी सकाळी आढळून आला. त्यामुळे खळबळ उडाली.

हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी त्यांचा अपहरणानंतर काही तासांतच घातपात केला असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

हिरण यांच्या अपहरणानंतर बेलापूर येथे शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला होता. त्यांच्या अपहरणाच्या घटनेनंतर गावातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अधिवेशनात या प्रकरणी प्रश्न उपस्थित केला होता. श्रीरामपूरचे काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र देत, हिरण यांचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर गौतम यांचा मृतदेह श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात आढळून आला. अंत्यविधी होईपर्यत गाव बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here