म. टा. प्रतिनिधी, पुणे: करोना नियमांचे उल्लंघन करीत साथीदारांसह एका कार्यक्रमात उपस्थित राहताना, आरडाओरडा करत परिसरात दशहत निर्माण करणारा गुंड (रा. सुतारदरा, कोथरूड) याला शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत प्रवेश करण्यास आणि वास्तव्यास दोन महिन्यांची मनाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हे आदेश दिले आहेत.

गुरूवार पेठ परिसरात २६ जानेवारीला एका संघटनेच्या कार्यक्रमाला गुंड शरद मोहोळ आणि त्याचे १० ते १२ साथीदार आरडाओरडा करत हजर झाले होते. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतर नागरिक भीतीने पळून गेले होते. करोना कालावधीतही नियमांचे पालन न करता मोहोळ टोळीने परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे त्याच्यासह साथीदारांविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून १६ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा आदेश खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार गँगस्टर शरद मोहोळ याला शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणे आणि राहण्यावर दोन महिने सक्त मनाई करण्याचा आदेश ४ मार्च रोजी देण्यात आला होता.

गजा मारणेला केले येरवड्यात स्थानबद्ध

कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणूक काढणारा कुख्यात गुंड गजा मारणेवर शहर व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. त्याला काही गुन्ह्यांत अटक केली होती. तर, काहींमध्ये त्याचा शोध सुरू होता. पुणे ग्रामीण व शहर गुन्हे शाखेची पथके त्याचा माग काढत होती. पण, पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला साताऱ्यातून अटक केली. त्याला येरवडा कारागृहात एका वर्षासाठी रविवारी स्थानबद्ध केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here