सिंधुदूर्गः जिल्ह्यात दोंडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात रानटी हत्तीने केलेल्या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. युवकाला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

काजू बागेत कामासाठी गेलेल्या युवकावर अचानक हत्तीने हल्ला केला. अचानक हल्ला झाल्यानं युक भयभयीत झाला त्यानंतर मदतीसाठी त्यानं आरडा ओरड केली. युवकानं प्रसंगावधान राखत मदतीसाठी आवाज दिल्यानं ग्रामस्थांनी लगेचच धाव घेतली. त्यामुळं युवकाचं प्राण वाचले आहेत. या तरुणाला उपचारांसाठी तत्काळ दोंडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तिथं त्याच्यावर प्राथमिक उपचारही सुरु होते. मात्र, गंभीर मार लागल्यानं त्याला अधिक उपचारांसाठी गोवा- बांबुळी येथील रुग्णालयात दाखल केले.

शेतकऱ्यांवर होणारे हे हल्ले आता चर्चेला विषय ठरला आहे. मागील वर्षी ही हत्तीने शेतकऱ्यांवर हल्ला केला होता. सातत्याने होणारे हल्ले व मानवी वस्ती पर्यंत हत्तीचा वाढता वावर यामुळे वर्ग त्रस्त आहे. शेतकऱ्यांवर हल्ले होत असतानाही वन विभाग मात्र हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी कमी पडत असल्याचं चित्र आहे. तर, प्रशासनही ठोस भूमिका घेताना दिसत नाहीये. हत्तीने शेतकरी याच्यावर हल्ला करुन तास उलटून गेले तरीही वन विभागाने अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here