नागपूर: रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर आज सकाळी ३६ लाख रुपयांच्या जप्त करण्यात आल्या. गस्तीवर असलेल्या आरपीएफच्या पथकाला प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर काही पार्सल आढळले. हे पार्सल उघडले असता, त्यात सिगारेटची पाकिटे होती. त्यांची किंमत ३६ लाख रुपये आहे.

अंबाला- बिलासपूर एक्स्प्रेसने हे पार्सल शनिवारी नागपूर येथे आणण्यात आले होते. मालाच्या विवरणात आत लेदर असल्याचे लिहिले होते. मात्र त्यातून तंबाखूचा गंध येत होता. त्यामुळे संशयावरून ते उघडून पाहिले असता, आत सिगारेट असल्याचे लक्षात आले. या सिगारेट पाकिटांची किंमत ३६ लाख रुपये आहे. रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वीच साडेनऊ लाखांच्या सिगारेट पकडल्या

नागपूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर रेल्वे पोलिसांनी अशीच कारवाई केली होती. जवळपास ९ लाख ६० हजार रुपयांच्या सिगारेट जप्त करून एकाला अटक केली होती. २८ फेब्रुवारीच्या रात्री ११.३० च्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली होती. हावडा- अहमदाबाद एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर उभी होती. त्याचवेळी आरपीएफ निरीक्षक आर. एल. मीना, कॉन्स्टेबल राजेश गडपलवार, श्याम झाडोकर हे तेथे गस्तीवर होते. या एक्स्प्रेसमधून पार्सल उतरवण्यात आले होते. तिथेच एक तरुण संशयितरित्या आढळून आला. पार्सलमधून तंबाखूचा गंध येत होता. त्यामुळे आरपीएफने त्याला विचारणा केली. क्लार्कला बोलावून पार्सल उघडले असता, त्यात सिगारेटची १९,२०० पाकिटे आढळून आली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here