सीमेवरील घनदाट जंगलात माओवाद्यांचे प्रशिक्षण शिबिर असल्याची माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली होती. तीन दिवसांपासून सदर परिसरात प्राणहिता पोलीस मुख्यालयचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वात सी-६० चे पथके अभियान राबवून माओवाद्यांच्या शस्त्र बनविण्याचा कारखाना उध्वस्त केले.
या वर्षातील हे सर्वात मोठे माओवादीविरोधी अभियान असून पहिल्यांदाच माओवाद्यांच्या गड असलेल्या अबुझमाडमध्ये हे यशस्वी अभियान राबविण्यात आल्याने महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही विशेष स्तुती केली होती. अबुझमाडमधील यशस्वी अभियानानंतर प्राणहिता पोलीस उप मुख्यालयात या सर्व सी-६० जवानांचे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन तोंड गोड करण्यात आले. यावेळी मनीष कलवानिया,सोमय मुंडे,भाऊसाहेब ढोले आदी उपस्थित होते.
माओवाद्यांच्या गड असलेल्या अबुझमाडमध्ये शिरुन विशेष अभियान राबवित असताना जवानांना बॅरेल ग्रेनेड लॉन्चर या शस्त्राची निर्मिती होत असल्याचे आढळले.यासोबतच कुकर बॉम्ब,भुसुरुंग स्फोटके आणि इतर दररोज वापरावयाचे साहित्य आढळले. येथील प्रत्यक्षदर्शी चित्र मटाच्या हाती लागले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times