मुंबई: राज्यात सलग दोन दिवस नव्या (Coronavirus) बाधित रुग्णांच्या संख्येने १० हजारांचा आकडा ओलांडल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी तर नव्या रुग्णसंख्येने ११ हजारांचा आकडा पार केला आहे. आज एकूण ११ हजार १४१ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज दिवसभरात एकूण ६ हजार १३ रुग्ण बरे झाले आहेत. सततच्या झपाट्याने वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे. (maharashtra registers 11141 new covid 19 cases 6013 recoveries and 38 deaths in the last 24-hours)

या बरोबरच राज्यात दिवसाला मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णसंख्येत कालच्या तुलेनेत काहीशी घट झाली आहे. आज राज्यात एकूण ३८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ४७ इतकी होती. आजची मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सध्या राज्यातील मृत्यूदर २.३६ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ६८ हजार ०४४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.१७ टक्के इतके झाले आहे.

तसेच राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६८ लाख ६७ हजार २८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख १९ हजार ७२७ नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे प्रमाण १३.१६ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ४ लाख ३९ हजार ०५५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर ४ हजार ६५० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या लाखाच्या आसपास

राज्यात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढून ती आज एकूण ९७ हजार ९८३ इतकी झाली आहे. राज्यातील प्रमुख शहरांचा विचार केल्यास मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती ९ हजार ३१९ इतकी झाली आहे. तर ठाण्यात ही संख्या १० हजार २९४ इतकी. तर, पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २० हजार ३४७, नाशिक येथे ४,७४१, अहमदनगर येथे १,८६९, औरंगाबाद येथे ४,२६४,६०४, नागपूर येथे ११ हजार ६३५, कोल्हापूर येथे ४८७ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्णसंख्या पुण्यात असून सर्वात कमी रुग्णसंख्या गोंदिया आणि गडचिरोली येथे आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या प्रत्येकी १७५ इतकी आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here