कोलकाताः कोलकातामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची ( ) सभा झाली. पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर ज्येष्ठ अभिनेते (mithun chakraborty ) यांनीही भाषण केलं. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मिथुन चक्रवर्ती ( ) यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. मी कोब्रा आहे, कुणी अधिकारांवर गदा आणली तर मी उभा आहे, असा इशारा मिथुन चक्रवर्ती यांनी दिला.

मी असली कोब्रा आहे. दंश केला तर तुमचा फोटो घरात लागेल. मी फक्त एक साप नाही, मी कोब्रा आहे. एका दंशात संपवून टाकेन, असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले. मिथुन चक्रवर्ती यांनी भाषणात आपल्या चित्रपटातील अनेक प्रसिद्ध डायलॉग म्हटले. ‘मारुगा यहां लाश गिरेगी श्मशान में भी’ हा प्रसिद्ध डायलॉगही ते म्हणाले. पण हा डायलॉग आता जुना असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘गरीबांसाठी काम करण्याची इच्छा’

काहीतरी मोठं काम करण्याचं स्वप्न मी एकदा पाहिलं होतं. पण एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आणि पंतप्रधान मोदी उपस्थित आहेत, असं इतकं मोठं स्वप्नही कधी बघितलं नाही. मला जीवनात काहीतरी मोठं काम करायचं होतं. पण कधी इतक्या मोठ्या सभेचा भाग असेल याची कल्पना केली नव्हती. १७ वर्षांचा असल्यापासून मला समाजातील गरीबांसाठी काम करण्याची इच्छा होती आणि आता ही इच्छा आता पूर्ण होणार आहे, असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले.

२०१४ मध्ये टीएमसीचे राज्यसभेचे खासदार होते

मिथुन चक्रवर्ती हे भाजपमध्ये जाणार याची जोरदार चर्चा होती. आज पंतप्रधान मोदींच्या त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पश्चिम बंगाल भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी मिथुन चक्रवर्ती यांनी भेट घेतली होती. तसंच दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मुंबईत अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच मिथुन चक्रवर्ती हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. यापूर्वी मिथुन चक्रवर्ती हे २०१४ मध्ये तृणमूल काँग्रेसच पक्षाचे राज्यसभेतील खासदार होते. त्यानंतर २०१६ मध्ये पोंजी घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांनी आरोग्याच्या कारणावरून राजीनामा दिला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here