म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने ११ मार्च ते चार एप्रिल दरम्यान अंशत: जाहीर केला आहे. दररोज रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. दर शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार पूर्णत: बंद ठेवले जाणार आहेत. आठवडी बाजार, लग्न सोहळे आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर पूर्णत: बंदी घालण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (partial announced in )

जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने ११ मार्च ते चार एप्रिल या कालावधीत अंशत: लॉकडाउन जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी सायंकाळी याबाबत अधिकृत घोषणा केली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आणि अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे उपस्थित होते.

जिल्ह्यात संसर्गाचा उद्रेक वाढला आहे. करोनाबाधितांची संख्या वाढली असून मृत्यूदर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. जिल्ह्यात १५ फेब्रुवारीपासून वाढणारी रुग्णसंख्या, इतर जिल्हे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या, उपचार पद्धती, उपलब्ध बेडचा आढावा घेण्यात आला.

लॉकडाउनचा भार पडू नये म्हणून विविध समाजघटकांशी चर्चा करुन अंशत: लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या ११ मार्च ते चार एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन राहणार आहे. दर शनिवारी-रविवारी पूर्णत: आणि दररोज रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत पूर्ण लॉकडाउन असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिली.

क्लिक करा आणि वाचा-
संसर्ग रोखण्यासाठी धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक आणि मेळाव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक सभागृहे, मंगल कार्यालये, लॉन्स यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे विवाह सोहळे होणार नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ आणि प्रशिक्षण संस्था बंद राहणार आहेत. जाधववाडी बाजार समिती सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

दरम्यान, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून इतर ठिकाणी ५० टक्के क्षमतेने व्यवहार सुरू राहतील. विविध आस्थापनांना दर पंधरा दिवसांनी कर्मचाऱ्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करणे बंधनकारक केले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here