सिंधुदुर्ग: तळकोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री. भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यत साध्या पध्दतीने होत आहे. दरवर्षी या जत्रोत्सवात सुमारे ७ ते ८ लाख भाविक सहभागी होत असतात. आंगणेवाडी येथील नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने राजकीय लोकांची येथे मांदियाळी नेहमीच असते. मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार आणि विविध पक्षाची नेते मंडळी हजेरी लावतात. पण यावर्षी पूर्ण गजबजलेला परिसर हा सुना सुना वाटत होता. ( is being celebrated in a simple manner)

आज देवीची सकाळी पहाटे ४ वाजता विधिवत पूजा झाली. त्यानंतर धार्मिक कार्यक्रम झाले. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ आंगणे कुटुंबीय आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा जत्रोत्सव होत आहे. जिल्ह्याधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ही जत्रा रद्द होत असून केवळ आंगणे कुटुंबापुरतीच मर्यादित जत्रा होत असल्याचे जाहीर केल्याने येथे इतर भाविकांना प्रवेश नव्हता.

करोनाचे नियम पालन करीत भाविकांची तापमान तपासणी केली जात आहे. तसेच सेनेटायझर वापर केला जात आहे. आरोग्य आणि पोलीस पथक तैनात आहे. जिह्याधिकारी के. मनुलक्ष्मी यांनी करोनाबाबतच्या नियमांचा भंग केल्यास कारवाई करण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर आंगणे कुटुंबाव्यतिरिक्त अन्य भाविकांना येथे मज्जाव करण्यात आला होता. मंदिर परिसरात येणारे तीन ही मार्ग पोलीस प्रशासनने सील केले होते. आत येणाऱ्या भाविकांची तपासणी केली जात होती. तसेच ज्याच्याकडे मंदिर प्रशासनाने अधिकृत पास आयडी दिला आहे, अशांना मंदिर प्रवेश दिला जात होता.

क्लिक करा आणि वाचा-

यंदा येथे आंगणे कुटुंबीयांचीच गर्दी दिसत आहे. दरवर्षी सुमारे ७ ते ८ लाख भाविक येथे येतात. मात्र आज हा परिसर सुना दिसत होता.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here