भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने मुंबई मिररला दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही सध्या विरोधात आहेत आणि शिवसेनेला आक्रमकपणे तोंड देणाऱ्या नेत्याची आवश्यकता आहे. कारण, मुंबई महापालिका निवडणूक आता फक्त दोन वर्षे दूर आहे.’
दरम्यान, लोढा हे प्रसिद्ध बिल्डरही आहेत आणि यामुळेच त्यांना शिवसेनेवर हल्लाबोल करताना काही मर्यादा येतात. ‘लोढा यांनी शिवसेनेला आक्रमकपणे अंगावर घेतलं तर त्यांचे चालू असलेले प्रकल्प थांबवले जातील. कारण, मुंबई महापालिकेत आणि राज्यात शिवसेनेची सत्ता आहे’, अशीही प्रतिक्रिया एका भाजप नेत्याने दिली.
‘मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती केली तेव्हा शिवसेनेसोबतची युती तुटेल आणि आम्हाला विरोधात बसावं लागेल, असा विचारही कुणी केला नव्हता. त्यामुळेच या हालचालीबद्दल वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे,’ अशी माहिती भाजपातील सूत्रांनी दिली.
लोढांच्या जागी या नावांची चर्चा
जूनमध्ये यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर मुंबई भाजपाची सूत्र लोढा यांच्याकडे देण्यात आली होती. त्याअगोदर मुंबई भाजप अध्यक्ष असलेले आशिष शेलार यांनी अत्यंत आक्रमकपणे शिवसेनेशी दोन हात केले होते. मुंबई महापालिका निवडणुकीत तर शेलार आणि शिवसेना नेते यांच्यातील आरोप-प्रत्यारोप टोकाला पोहोचले होते.
नवीन मुंबई अध्यक्ष म्हणून शेलार यांच्यासह कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर, विले पार्लेचे आमदार पराग अलवानी आणि अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांच्या नावाची चर्चा आहे.
भाजपातील सूत्रांच्या मते, ‘मुंबईतील उत्तर भारतीय आणि गुजराती समुदाय हा भाजपचा पारंपरिक मतदार आहे. त्यामुळे मुंबई भाजपचा अध्यक्ष मराठी असावा आणि त्याखालोखाल उत्तर भारतीय आणि गुजरातील विभाग प्रमुख असावा. यामुळे शिवसेनेवर मात करणं सोपं होईल.’
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times