करोनानंतर लागलेल्या लॉकडाऊनच्या काळातील कठोर निर्बंध मनसेला फारसे रुचले नव्हते. त्यातही मुंबईतील लोकल आणि दारूच्या दुकानांवरील निर्बंध हटवले जावेत, यासाठी मनसेनं पाठपुरावा केला होता. मात्र, सरकारनं त्याकडं लक्ष दिलं नव्हतं. आता करोना पुन्हा वाढू लागल्यानं मास्क घालण्याचं व काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. मात्र, खुद्द मनसे अध्यक्षच मास्क न घालता फिरत आहेत.
वाचा:
राज ठाकरे हे अलीकडेच नाशिक दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी फेसमास्क घातला नव्हता. इतकेच नव्हे तर, स्वागतासाठी सामोऱ्या आलेले माजी महापौर अशोक मुर्तडक यांनाही तोंडावरील डबल मास्कबद्दल विचारणा केली होती. त्यानंतर मुर्तडक यांनी चेहऱ्यावरील मास्क काढून ठेवला होता. त्याआधी २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत झालेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे सहभागी झाले होते. त्यावेळीही त्यांनी मास्क घातला नव्हता. पत्रकारांनी याबाबत विचारलं असता, ‘मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतो…’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
वाचा:
रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मास्क न घालणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर राज्यात कारवाई केली जाते, तशीच नेत्यांवरही झाली पाहिजे. राज्य सरकारनं दिलेले आदेश सर्वांनीच पाळले पाहिजेत. राज ठाकरे यांनी देखील पाळले पाहिजेत. पण कदाचित मुख्यमंत्री यांचे आदेश राज यांना पाळायचे नसतील, म्हणून ते मास्क घालत नसावेत, असा तर्क आठवले यांनी मांडला. सातारा इथं ते पत्रकारांशी बोलत होते.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times