मुंबईः अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. आज विधीमंडळात महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प दुपारी दोन वाजता सादर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच विधानसभेत मोठी खळबळ उडाली आहे. दोन दिवसांत ३६ कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे.

अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विधानसभा परिसरात मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. सभागृहात आमदारांसाठी विशिष्ट अंतर राखत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. योग्य ते अंतर राखले जावे यासाठी काही आमदारांची बसण्याची व्यवस्था ही अधिकारी कक्ष आणि प्रेक्षक गॅलरीत करण्यात आली आहे. अधिवेशन काळात विधानभवन परिसरात गर्दी होऊ नये यासाठी आमदारांच्या पीएंना विधानभवनात प्रवेश नाकारण्यात येणारआला आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्र्यांसह आमदार, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांची करोना चाचणीही करण्यात आली होती. त्यानंतर पून्हा एकदा विधानसभेतील कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली आहे.

६ व ७ मार्चला २ हजार ७४६ कर्मचाऱ्यांचे नमुने करोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. यामध्ये ३६ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आज अर्थसंकल्प सादर होत असताना विधानसभेतील कर्मचारीच करोनाबाधित सापडल्यानं चिंता वाढली आहे. तसंच, अधिवेशन सुरु असतानाच ५ मार्च रोजी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनाही करोनाची लागण झाली आहे.

मोठी बातमी! खाद्यतेल स्वस्त होणार; ‘हे’ आहे कारण

आज अर्थसंकल्प सादर होणार

आज २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होत असून आर्थिक स्थिती सावरण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा अथवा योजनांना स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. मात्र पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरून केंद्र सरकारला लक्ष्य करणाऱ्या आघाडी सरकारकडून इंधनावरील कर काही प्रमाणात कमी करीत सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here