मुंबई: मनसे अध्यक्ष यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाचा विरोध मागे घेतल्यानंतर हा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी याविषयी बोलताना राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. तसंच, शिवसेनेला टोला हाणला आहे.

विधानभवनाच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. राज ठाकरे यांनी कालच मुख्यमंत्री यांना नाणार रिफायरी प्रकल्पाच्या संदर्भात पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्राने सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प हातातून गमावू नये. हे महाराष्ट्राला आज परवडणारं नाही,’ असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. प्रकल्पाच्या विरोधकांनी राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. फडणवीस यांना याबाबत विचारलं असता, त्यांनी राज यांच्या भूमिकेचं स्वागत केलं.

वाचा:

‘अनिल काकोडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज यांनी ही भूमिका घेतली आहे. कोकणच्या विकासासाठी नाणार प्रकल्प महत्त्वाचा आहे. ही ग्रीन रिफायनरी आहे. गुजरातमधील ग्रीन रिफायनरीच्या परिसरात सर्वोत्तम आंबे होतात. फळबागा होतात. त्यामुळे प्रदूषणाबद्दलच्या शंका चुकीच्या आहेत. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. आर्थिक व्यवहार वाढणार आहेत. हजारो लोकांना थेट आणि लाखो लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतली ही आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे. यामुळं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे,’ असं फडणवीस म्हणाले.

वाचा:

‘नाणार प्रकल्पामुळे होणारे फायदे उद्धव ठाकरे यांनी देखील काकोडकर यांच्यासारख्या तज्ज्ञांच्याकडून समजून घ्यावेत आणि त्याला पाठिंबा द्यावा. याचा निवडणुकीशी संबंध लावण्याचं कारण नाही ही पूर्णपणे एका प्रकल्पाबद्दलची आमची भूमिका आहे. शिवसेनेचे स्थानिक नेत्यांना मन मोकळं करण्याची संधी दिली तर त्यांचाही या प्रकल्पाला पाठिंबा असल्याचं आपल्याला दिसेल. मात्र, पक्षाच्या भूमिकेमुळं त्यांना उसनं अवसान आणून नाणार प्रकल्पाला विरोध करावा लागत आहे,’ असं फडणवीस म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here