अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी अजित पवारांनी कोविड योद्ध्यांचे आभार मानले आहेत करोनासंकटामुळं राज्याच्या अर्थसंकल्पात यंदा आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. तसंच, करोनामुळं सर्वच क्षेत्रातील आरोग्य सेवा सुधारीत करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक विभागाच्या अंतर्गंत आरोग्य संस्थाचे बांधकाम श्रेणीवर्धन करुन जनतेला उत्तम आरोग्य सेवा देण्याचे उद्देशानं सुमारे ७ हजार ५०० कोटींचा प्रकल्प तयार केला असून येत्या चार वर्षात तो पूर्ण येईल. या प्रकल्पांतर्गंत जिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, मनपा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, मनो रुग्णालय या रुग्णालयांचे बांधकाम व नवीन रुग्णलयांचे श्रेणीवर्धन व बांधकाम यात समावेश आहे. तर, प्रत्येक जिल्ह्यात कोविड उपचार केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
मनपा, नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये आरोग्याच्या पायाभूत सुविधा उभारणारण्यात येणार आहे. येत्या पाच वर्षात या आरोग्य सुविधांसाठी ५ हजार कोटींचा निधी देण्यात येणार असून ८०० कोटी यंदा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आग प्रतिबंधक उपकरणांची आवश्यकता असलेल्या रुग्णालयात उपकरणांची तरतूद करण्यात येईल. तसंच, अमरावती, सातारा, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड येथे नवीन शासकीय मेडिकल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times