अहमदनगर: संगमनेरहून मुंबईकडे अवैधरित्या गोमांस घेऊन जाणाऱ्या पीकअपला पुणे-नाशिक महामार्गावर शिवारात अपघात झाला. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप व्हॅन महामार्गावर पलटी होऊन त्यातील जनावरांचे मांस महामार्गावर विखुरले गेले.

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास दीड ते दोन तास ठप्प झाली होती. महामार्ग पोलिसांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली असून महामार्गावर विखुरलेल्या जनावरांच्या मांस पीकपसह बाजूला घेण्याचे काम सुरू आहे. वाहन चालकासह इतर फरार झाले.

वाचा:

संगमनेरहून मुंबईकडे पिकअपमधून (एमएच ४७ ई २७६०) दोन टन गोमांस वाहून नेले जात होते. या वाहनाला डोळसणे शिवारातील बाबलेवाडी जवळ सकाळी आठ वाजता अपघात झाला. याप्रकरणी चालक घटनास्थळावरून फरार झाला असून घारगाव पोलीस वाहनाच्या मालकाचा शोध घेत आहे. घारगाव पोल‌िस स्थानकात दुपारपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here