सुरेश कौलगेकर । सिंधुदुर्ग

दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या महाशिवरात्र यात्रेचे स्वरूप मर्यादित आहे. यावर्षी ११ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त होत असलेल्या श्री देव कुणकेश्वराचा यात्रोत्सव केवळ फक्त ट्रस्ट सदस्य व पुजारींच्या उपस्थितीतच होणार असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केले.

वाचा:

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारान्वये दिनांक ११ मार्च २०२१ रोजी होणाऱ्या देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील श्री स्वयंभू देवाचा वार्षिक उत्सव फक्त मंदिराचे पुजारी, ट्रस्ट, देवस्थान समिती सदस्य यांच्या उपस्थितीतच करण्याचे आदेश दिले आहेत.

असे आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  • गर्दी होईल अशा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे किंवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये.
  • यात्रेतील धार्मिक विधी मंदिराचे पुजारी, ट्रस्ट, देवस्थान समितीचे सदस्य यांनीच करायचे असून त्यासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींची मर्यादा असेल.
  • यात्रेच्या ठिकाणी गर्दी करण्यास मनाई
  • यात्रेतील धार्मिक कार्यक्रमास अन्य व्यक्तींना उपस्थित राहण्यास मनाई
  • कार्यक्रमाच्या वेळी कोविड – १९ विषयीच्या उपयायोजनांचा अवलंब करण्यात यावा
  • आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here