मुंबईः उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी आज विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प साजर केला. अर्थसंकल्पात सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारनं सिट्रस इस्टेट प्रकल्पाची घोषणा केली आहे,

विदर्भातील संत्री उत्पादक शेतकऱ्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड व मोर्शी तालुक्यांत अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया स्थापन करण्यात येणार आहे. मराठवाडा व आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्याकरता औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे ६२ एकर जागेवर ‘सिट्रस इस्टेट’ स्थापना करण्यात येणार आहे.

पंजाबच्या धर्तीवर सिट्रस इस्टेट

पंजाबमध्ये सिट्रस इस्टेट नावाची एक सेमी गर्व्हमेन्ट संस्था स्थापन केली आहे. त्या संस्थेसाठी आर्थिक तरतूद आहे. उपसंचालक दर्जाचा एक अधिकारी व तज्ज्ञांची त्यावर नियुक्ती केली. ही संस्था संत्रा लागवड क्षेत्रातील माती परीक्षण करते. पानांचे विश्लेषण करून कशाची कमतरता आहे हे सांगते. उच्च प्रतीच्या कलमा उपलब्ध करून देण्यापासून तर लागवडीतील अडचणी सोडविण्यापर्यंत सर्व प्रकारचे मार्गदर्शन सिट्रस इस्टेट करते.

सिट्रस इस्टेटचे फायदे

संत्रा लागवडीवर ही इस्टेट थांबत नाही तर ग्रेडिंग अँड कोटिंग सेंटरमध्ये आवश्यक ती प्रक्रिया संत्र्यावर केली जाते. त्यानंतर संत्री भरायला पेट्या पुरविल्या जातात. ग्रेडिंग, कोटिंगसाठी ५० टक्के सवलत दिली जाते. संत्र्यासाठी मार्केट कुठे उपलब्ध आहे हे देशभरचा आढावा घेऊन रोजच्या रोज सांगितले जाते. संत्र्याच्या वाहतुकीसाठीही ५० टक्के सबसिडी दिली जाते. त्यामुळेच ही संत्री देशात कुठेही दिसतात.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here